कोरोना संसर्गाचा मुकाबला करणाऱ्या पोलिसांना मात्र उपचारासाठी भरावी लागत आहेत लाखो रुपयांची बिलं

कोरोना संसर्गाचा मुकाबला करणाऱ्या पोलिसांना मात्र उपचारासाठी लाखो रुपयांची बिलं भरावी लागत आहेत. करोना संसर्गापासून जगाला संरक्षण देणाऱ्या आरोग्य आणि पोलिस सेवा यांचं सर्वत्र कौतुक होत असताना कळवा सफायर रुग्णालयात करोना उपचारासाठी दाखल असणाऱ्या पोलिसांना लाखोची बिलं भरावी लागत असून रुग्णालय प्रशासन कोणालाही जुमानत नसल्याचे चित्र आहे. पोलीस दिवसरात्र जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळं त्यांनाही करोनाचा संसर्ग होत आहे. अशावेळी शासनाने विविध योजनांतर्गत उपचार करण्याची व्यवस्था केली असताना सफायर रुग्णालयात करोना उपचारासाठी दाखल असणाऱ्या पोलिसांकडून मात्र लाखो रूपये वसूल करण्यात येत आहेत. मेडिक्लेम असतानाही तो स्वीकारत नसून कोरोनावर कोणताही उपचार, औषधे नसताना एवढी बीलं कशी असा प्रश्न आहे. त्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण होत असल्याचं त्यांच्या नातेवाइकांचं म्हणणे आहे.
करोनाच्या लढाईत पोलीस हा अतिशय महत्त्वाचा शिलेदार आहे. पोलिसांना होणारा कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने पोलिसांची काळजी घेतली पाहिजे आणि पोलिसांच्या आरोग्य विषयांवर गंभीरपणे विचार करावा अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading