ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं ड्रग्ज विकणा-या दोन नायजेरियन व्यक्तींसह एका रिक्षा चालकाला केली अटक

ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं ड्रग्ज विकणा-या दोन नायजेरियन व्यक्तींसह एका रिक्षा चालकाला अटक केली आहे. घोडबंदर रोड येथील बाईक हॉटेल समोर कोकेन हा अंमली पदार्थ विकण्यासाठी एक नायजेरियन व्यक्ती येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभाग युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. या माहितीनुसार सापळा रचून पोलीसांनी या ड्रग्ज विकणा-या व्यक्तींना अटक केली. या प्रकरणी पॉल चुकवू या नायजेरियन व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले, त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ 12 लाख 80 हजार रुपये किमतीचे 32 ग्रॅम कोकेन आणि 10 लाख 20 हजार रुपये किंमतीचे LSD हे अमली पदार्थ आणि एक मोबाईल फोन असा 14 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. तसेच वागळे इस्टेट येथील इंदिरानगर येथे एक नायजेरियन व्यक्ती रिक्षातून ड्रग्स विकण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती त्या प्रमाणे गोक लॉरेन्स अजाह याच्यासह रिक्षा चालक लक्ष्मण साव यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून 46 लाखांचे 115 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ, एक रिक्षा असा 47 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading