गौतम कोतवाल यांच्या कॅप्टन कूल या पुस्तकाचे प्रकाशन

गौतम कोतवाल यांच्या कॅप्टन कूल या पुस्तकाचे प्रकाशन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. कल्याणच्या के सी गांधी हायस्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे आणि कल्याणचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत पाटील उपस्थित होते. राज्यातील सर्वात पहिला कोरोना रूग्ण कल्याण-डोंबिवलीमध्ये मिळाला होता तर पहिला मृत्यू देखील कल्याण-डोंबिवलीमध्येच झाला होता. यावेळी कल्याण डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण होतं. या काळात कल्याण डोंबिवली महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, राजकीय नेते आणि डॉक्टरांनी मदतीचा हात मागितला होता. त्यानंतर डॉक्टरांची एक आर्मी टीम तयार होऊन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी दिवसरात्र झटत होती. याचं वर्णन गौतम कोतवाल यांनी कॅप्टन कुल या पुस्तकात केलं आहे. यावेळी अनेकांनी आपले जीव गमावले. अनेकांना मदतीचे हात कशा प्रकारे मिळाले यांच्या अनुभवांची मांडणी कोतवाल यांनी केली आहे. यावेळी उपस्थितांनी कोविड काळातले आपले अनुभव सांगितले. कोरोना काळात एक योध्दा म्हणून रूग्णांची कशी सेवा केली याच्याही आठवणी काहींनी सांगितल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading