टाऊन हॉलच्या व्यवस्थापकांना अखेर मिळालं मानधन

टाऊन हॉलच्या व्यवस्थापकांना अखेर त्यांचं मानधन मिळालं आहे. शहरातील टाऊन हॉलची देखरेख आणि काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तीन वर्षापासून सदाशिव कुलकर्णी यांची कंत्राटी पध्दतीनं नेमणूक केली आहे. मात्र त्यांना नेमणूक पत्र आणि तीन वर्षांचं मानधनही मिळालं नव्हतं. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळवून कुलकर्णी यांना हे मानधन मिळवून देण्यात यश मिळवलं आहे. मोने यांनी जिल्हाधिका-यांकडे याबाबत विचारणा केली होती. मोने यांच्या पत्रानंतर जिल्हाधिका-यांनी कुलकर्णी यांचं मानधन देण्याचे आदेश दिले आहेत. तीन वर्षांचे दीड लाख रूपये आणि यापुढे दर महिन्याला १० हजार रूपये मानधन म्हणून देण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading