खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेली कामं युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा वेग वाढवतानाच केंद्रीय खाडी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाअंतर्गत प्रलंबित केलेली कामं वगळून उर्वरित सर्व कामं युध्द पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. नागला बंदर, पारसिक रेतीबंदर, साकेत, बाळकूम, कोपरी, कळवा, वाघबीळ, कावेसर, कोलशेत अशा ठिकाणी किनारा सुशोभिकरण प्रकल्पाची कामं सुरू आहेत. या कामांचा पालिका आयुक्तांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. पारसिक रेतीबंदर येथील कामं सुरू करण्यास काही अडचण नसल्यानं हे काम युध्दपातळीवर पूर्ण करावं. नागला बंदर येथील प्रतिबंधित काम वगळून उर्वरित काम पूर्ण करावं असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले. वाघबीळ येथील किनारा सुशोभिकरण प्रकल्पाचं काम कॉन्क्रीट बांधकाम वगळून तसंच खारफुटीला बाधा न पोहचवता पूर्ण करावं, साकेत-बाळकूम येथील जुन्या बंदराची पुनर्बांधणी करता येईल का याची पडताळणी करावी, कोलशेत-कोपरी येथील कामं करण्यास कोणताही अडथळा नसल्याचंही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. खाडी किनारा सुशोभिकरण प्रकल्पांतर्गत खाडी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणानं प्रलंबित केलेली कामं तसंच खारफुटीला कोणतीही बाधा न पोहचवता त्या प्रकल्पाची कामं पूर्ण करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading