झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी घरफोड्या करणा-यास अटक

डोंबिवली जवळील निळजे गावातील एका तरुणांने मास मीडिया कम्यूनीकेशन पर्यंतचं शिक्षण घेतलं त्यानंतर एका वृत्तपत्रात नोकरीलाही लागला. मात्र याच दरम्यान त्याला डान्स बारचे व्यसन लागले आणि डान्सबार मध्ये पैसे उडवण्यासाठी झटपट पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी तो चोरीच्या मार्गाकडे वळला.हा तरुण भरदिवसा बंद घरे हेरून घरोफोड्या करायचा. एकटाच असल्याने पोलिसांची देखील त्याचा शोध घेता घेता महिना भर दमछाक झाली होती.अखेर खडकपाडा पोलिसांनी सीसीटिव्ही आणि तांत्रिक तपास करत या चोरट्याला खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रोशन जाधव असे या आरोपीचे नाव असून डोंबिवलीतील निळजे गाव येथे राहणारा आहे. या तरुणाने पत्रकारीतीचे उच्चशिक्षण घेतले असून काही वर्षे तो एका मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात काम करत होता. त्याच्याकडून एकूण ८ गुन्हे उघडकीस आणले असून ४७ तोळे सोन्याचे दागिने, एक लॅपटॉप, एक मोबाईल फोन दोन घड्याळ असा लाखोंचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading