कल्याण पूर्वेतील रस्ते, नाले, वाहतूक कोंडी होणाऱ्या २६ रस्त्यांची पालिका आयुक्तांनी पाहणी केली. कल्याण पूर्व समस्याचे आगार असून दैनंदिन जीवन जगताना नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. या भागातील रस्ते अरुंद असून अनेक ठिकाणी हे रस्ते दुसऱ्या रस्त्याला जोडलेलेच नाहीत. तर नाल्यावर बांधण्यात आलेल्या कलवट अरुंद असल्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील सांडपाणी नागरिकाच्या घरात शिरते, परिणामी नागरिकाचा संसार पुरात वाहून जातो दरवर्षी या भागाला या समस्येला सामोरे जावे लागते. म्हणूनच पालिका आयुक्तांनी आज कल्याण पूर्वेतील समस्याची पाहणी केली. या भागातील रस्ते, कलवट, तुटलेले रस्ते, वाहतूक कोंडी यासारख्या २६ ठिकाणाची पाहणी या दौऱ्यात आयुक्तांनी केली असून लवकरात लवकर या समस्या सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.