पोखरण रोड नंबर १ येथे रस्त्याचं काम सुरू असताना एका डंपरला आग लागण्याचा प्रकार

पोखरण रोड नंबर १ येथे रस्त्याचं काम सुरू असताना एका डंपरला आग लागण्याचा प्रकार घडला. सुदैवानं यामध्ये कोणाला दुखापत झाली नाही. आज दुपारच्या सुमारास उपवन येथे आर.पी.एस इन्फ्रा प्रा. लि. या कंपनी कडून उपवन ते वर्तकनगर या रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथील टाटा कंपनीच्या रिकाम्या डंपरला आग लागली होती. हे वृत्त कळताच वर्तकनगर पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी पोहचून आग विझवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading