ज्युपिटर, हिरानंदानी, क्युरे हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल म्हणूुन घोषित करण्याची ठाणे मतदाता जागरण अभियानाची मागणी

होरायझन हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय योग्य असून रूग्णांना पैसे परत करावेत आणि ज्युपिटर, हिरानंदानी, क्युरे हॉस्पिटल कोव्हिड हॉस्पिटल म्हणून घोषित करावी अशी मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानानं केली आहे. आयुक्तांकडे एका निवदेनाद्वारे या मागण्या करण्यात आल्या आहेत. होरायझन रूग्णालयात रूग्णांना प्रचंड बिलं येत होती. त्यामुळे ही कारवाई एकप्रकारे योग्यच असल्याचं अभियानानं म्हटलं आहे. कोविडचा संसर्ग पाहता ज्युपिटर, हिरानंदानी, क्युरे ही रूग्णालयं कोविड रूग्णालयं म्हणून घोषित करून दरनिश्चिती करावी आणि मंजूर दरात कोव्हिड रूग्णाला सेवा देण्याचे बंधन घालून रूग्णालय सुरू करण्यास परवानगी द्यावी. ज्या रूग्णांकडून जादा बिलं आकारली गेली आहेत त्यांना रूग्णालयाने रक्कम परत करावी, महापालिकेमार्फत इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार रोखता येईल अशा काही मागण्या अभियानानं आयुक्तांकडे केल्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading