ज्युनियर एशियन रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळेला अंतिम फेरीत स्थान

मलेशिया इथे झालेल्या ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप रिदमिक जिम्नॅस्टीक स्पर्धेत ठाण्याच्या संयुक्ता काळे हिनं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. ठाण्यातील न्यू होरायझन स्कूलची संयुक्ता काळे, सिंघानिया स्कूलची श्रेया भंगाळे आणि ज्ञानसाधना स्कूलची अस्मी बडदे या तिघी एशियन ज्युनियर चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी मलेशियाला गेल्या होत्या. यापैकी संयुक्ता काळे हिनं पात्रता फेरीत १५.१ गुण मिळवून सातवा क्रमांक मिळवत अंतिम फेरीसाठी आपलं स्थान पक्कं केलं आहे. भारतीय रिदमिक जिम्नॅस्टीक इतिहासात प्रथमच एखाद्या भारतीय खेळाडूला इतके गुण मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळालं आहे. या स्पर्धेत एशियन जिम्नॅस्टीक युनियनमध्ये येणारे जपान, चीन, मलेशिया, उझबेकीस्तान, कझाकीस्तान यासारखे आधीपासून या खेळात वर्चस्व असणारे अनेक आशियाई देश प्रतिस्पर्धी असताना संयुक्ता काळे हिनं गाठलेली मजल खूप मोठी आहे. या तिघीही फिनिक्स जिम्नॅस्टीक ॲकॅडमीमध्ये पूजा आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी त्यांचं खास कौतुक केलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading