ज्युदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील अपूर्वा पाटीलला सुवर्णपदक

नाशिक येथे झालेल्या ४९ व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट ज्यूदो स्पर्धेत सरस्वती क्रीडा संकुलातील अपूर्वा पाटील हिने ७८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर स्वप्नील मांढरे यांनी ९० किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. १६ ते १८ ऑगस्ट रोजी लखनऊ येथे होणाऱ्या सीनियर राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुवर्णपदक विजेती अपूर्वा पाटील हिची निवड झाली आहे. सरस्वती क्रीडा संकुलात देवीसिंग राजपूत आणि सहप्रशिक्षक भूपेंद्रसिंग राजपूत यांच्या निरीक्षणाखाली हे दोघे ज्यूदोचे प्रशिक्षण घेतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading