उत्सव 75 ठाणे महोत्सवात प्राचीन नाणी, शबद्कोश पाहण्याची ठाणेकरांनी संधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त महापालिका पुरस्कृत उत्सव 75 ठाणे महोत्सवात उदृया प्राचीन नाणी, शब्दकोश प्रदर्शन ठाणेकरांना पाहावयास मिळणार आहे. 12 ऑगस्ट रोजी मराठी परिभाषा कोश आणि प्राचीन नाण्यांचे प्रदर्शन सकाळी 10 ते 7 या वेळेत प्राच्य विद्या अभ्यास संस्था, हाजुरी रस्ता, वागळे इस्टेट येथे भरविण्यात आले आहे. तर सकाळी 10 ते 7 या वेळेत मराठी शबद्कोश प्रदर्शन बेडेकर महाविद्यालयात आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्राचीन नाणी तसेच तसेच मराठी परिभाषा तसेच शब्दकोश पाहावयास मिळतील. ज्ञानसाधना महाविद्यालय येथे क्रांतीकारकावर डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे व्याख्यान होणार आहे. तर दुपारी बेडेकर महाविद्यालय येथे ‘राष्ट्रार्पणमस्तू’ हा संत आणि क्रांतीकारक यांच्या क्रांती यज्ञावर शालेय विद्यार्थ्यांचा नाट्याविष्कार सादर होणार आहे. ठाणेकरांनी ठाणेकरांसाठी असलेल्या या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव 75 ठाणेचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading