जिल्ह्यामध्ये वयाची ८० पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार

जिल्ह्यामध्ये वयाची ८० वर्ष पार केलेले १ लाख ३२ हजार ७५० मतदार आहेत तर सर्वात तरूण म्हणजे १८ ते १९ वर्ष वयोगटातील मतदानाचा प्रथम हक्क बजावणारे ४३ हजार ७५८ मतदार आहेत. जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार आहेत. यामध्ये २० ते २९ वयोगटातील ८ लाख ९९ हजार ३५२, ३० ते ३९ वयोगटातील १४ लाख ७१ हजार २७९, ४० ते ४९ वयोगटातील १५ लाख ६३ हजार २१०, ५० ते ५९ वयोगटातील १० लाख ९५ हजार ४२६, ६० ते ६९ वयोगटातील ६ लाख १३ हजार ६२९, ७० ते ७९ वयोगटातील २ लाख ७३ हजार तर ८० वर्षापेक्षा अधिक वयोगटातील १ लाख ३२ हजार ७५० मतदार या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading