जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ लोकसभा मतदार संघासाठी प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची जिल्ह्यातील १८ विधानसभा संघनिहाय सरमिसळ करण्यात आली. जिल्हा निवडणुक अधिकारी राजेश नार्वेकर तसंच इतर वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली ऑनलाईन पध्दतीनं ही सरमिसळ करण्यात आली. जिल्ह्यातील मतदार संख्येच्या प्रमाणानुसार ६ हजार ४८८ मतदान केंद्रं आहेत. तर २२७ नवीन मतदान केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रात मतदान यंत्र, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशिन देण्यात येणार आहे. सध्या ही यंत्रं जिल्हास्तरावर स्ट्रॉँगरूममध्ये इंजिनियर्स मार्फत तपासून ठेवण्यात आली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading