जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार कोणता द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील – श्रीकांत शिंदे

जिल्ह्यात शिवसेनेचा उमेदवार कोणता द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील असे प्रतिपादन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ठाणे लोकसभा आणि कल्याण लोकसभा त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार मोठ्या मतांनी जिंकून येतो. शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या अलायन्समध्ये गेल्या अनेक वर्ष शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला कोणता उमेदवार द्यायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आणि प्रत्येक अध्यक्ष ठरवतील. काही लोकांचे वक्तव्य मनोरंजन सारखे प्रसिद्धीसाठी काय ना काही बडबडतात यांच्या बोलण्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही. दसरा मेळावा बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य वेळी निर्णय घेऊन आपले मत स्पष्ट करतील असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading