कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून अखेर विद्यमान आमदार सुभाष भोईर यांचा रमेश म्हात्रेंना पाठिंबा जाहीर

कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार सुभाष भोईर यांनी अखेर माघार घेतली आहे. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेनेनं युती होण्यापूर्वीच एबी फॉर्म दिले होते. यामध्ये सुभाष भोईर यांनाही एबी फॉर्म दिला होता. मात्र नंतर त्यांच्यावरून बराच वाद झाला. शिवसेनेत गटबाजी झाली. शिवसेनेकडून माजी महापौर रमेश म्हात्रे यांनाही एबी फॉर्म देण्यात आला. त्यामुळं अगदी कालपर्यंत या मतदारसंघात शिवसेनेकडून दोन उमेदवारांनी अधिकृतपणे आपली उमेदवारी दाखल केली होती. दोघंही निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम होते. मात्र आज सुभाष भोईर यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा रमेश म्हात्रे यांना असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं या मतदारसंघातील वाद शमला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading