जिल्ह्यातील तिन्ही जागा आणि पालघरची जागा शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीकडे

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना ३ लाख ५२ हजार ६५३
मतांची आघाडी मिळाली आहे. ६ वाजून ३० मिनिटांनी हाती आलेल्या
आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ६ लाख २७ हजार ६७९ तर आनंद परांजपे यांना
२ लाख ७५ हजार २६ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना ३ लाख ३७ हजार
५०१ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना ४ लाख ७५ हजार २६९ तर
बाबाजी पाटील यांना १ लाख ३७ हजार ७६८ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना १ लाख
४९ हजार ६७९ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना ५ लाख ३ हजार
३८५ तर काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना ३ लाख ५३ हजार ७०६ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८ हजार ८८३ मतांनी आघाडीवर
आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ८० हजार ४७९ मतं तर बहुजन विकास
आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार ५९६ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading