विचारे- शिंदे यांना २ लाख ६२ हजाराहून अधिक मतांची आघाडी

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजन विचारे यांना २ लाख ६२ हजार ३५९
मतांची आघाडी मिळाली आहे. ५ वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजन विचारे यांना ४ लाख ६५ हजार ४४३ तर आनंद परांजपे यांना २ लाख ३ हजार ८४ मतं मिळाली आहेत.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना २ लाख ६२ हजार
९५१ मतांची आघाडी मिळाली आहे. श्रीकांत शिंदे यांना ३ लाख ६५ हजार ४०२ तर
बाबाजी पाटील यांना १ लाख २ हजार ४५१ मतं मिळाली आहेत.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कपिल पाटील यांना ८९ हजार
९७३ मतांची आघाडी मिळाली आहे. कपिल पाटील यांना ३ लाख ७४ हजार ८५५ तर
काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना २ लाख ८४ हजार ८८२ मतं मिळाली आहेत.

पालघर मतदारसंघात शिवसेनेचे राजेंद्र गावित ८८ हजार ५९८ मतांनी आघाडीवर
आहेत. राजेंद्र गावित यांना ५ लाख ७९ हजार ९८९ मतं तर बहुजन विकास
आघाडीच्या बळीराम जाधव यांना ४ लाख ९१ हजार ३९१ मतं मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading