जिल्ह्यांतील शाळा मॉडेल स्कुल करण्याचे पालक मंत्र्यांचे आदेश

ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध यंत्रणांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. जिल्ह्यातील शाळा मॉडेल स्कूल करण्यासाठी आणि आरोग्य विभागाच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेऊन देसाई म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित उपयोजना आणि विशेष घटक योजनेतून आतापर्यंत झालेल्या कामांचा आणि निधी खर्चाचा आढावा घेतला. उपलब्ध नियतव्यातून 65 टक्के खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत 100 टक्के खर्च करण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यासाठी अतिरिक्त निधी मिळावा, यासाठी वित्तमंत्र्यांकडे राज्यस्तरीय बैठकीत मागणी केली आहे. 2023-24 या वर्षासाठी ठाणे जिल्ह्यासाठी 850 कोटींच्या निधीची मागणी केली आहे. यावर्षी ही रक्कम 618 कोटी रुपये मिळाले होते. जिल्ह्यात सहा ग्रामीण रुग्णालये आहेत. त्या रुग्णालयांमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अत्याधुनिक मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर उभारण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading