पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते लोकार्पण

पूर्व द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित कोपरी पुलाचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. हा पूल कार्यान्वित झाल्यामुळे ठाणे आणि मुलुंड या दोन शहरामधील वाहतूक कोंडी कमी व्हायला निश्चितच मदत होणार आहे. 1958 साली मुलुंड आणि ठाणे शहरांना जोडणारा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून रेल्वे ट्रॅकवर उभारण्यात आला होता. मात्र कालांतराने हा पूल धोकादायक बनल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे तो अरुंद ठरू लागल्याने तो पुन्हा नव्याने बांधण्याची मागणी पुढे आली होती. त्यावेळी हा पूल लवकरात लवकर बांधण्यासाठी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा देखील करण्यात आला होता. अखेर 24 एप्रिल 2018 रोजी या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि आज तब्बल पांच वर्षांनी या पुलाचं लोकार्पण करण्यात आले. यापुलाची एकूण लांबी 796 मीटर एवढी असून 65 मीटर एवढी त्याची एकूण रुंदी आहे. या पुलाची रेल्वे ट्रॅकपासूनची उंची 6 हजार 525 मीटर एवढी असून या पुलाची दोन्ही बाजूकधील रुंदी प्रत्येकी 37.4 मीटर एवढी आहे. पुलाचं लोकार्पण झाल्यामुळे वाहन चालकांची वाहतुक कोंडीतुन मुक्तता होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading