मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केला साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक दोन दिवस आधीपासूनच ठाण्यात झळकत होते. संपूर्ण शहर हे त्यांच्या शुभेच्छा देणाऱ्या फलकान झळकलं होतं मुख्यमंत्री राहत असलेल्या लूईसवाडीतील महामार्गासमोर जीवेत शरद शतम असे फुलांनी सजवलेले फलक लावण्यात आले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ठाण्यात येऊन मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले संभाजी शिंदे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती.या पार्श्वभूमीवर साऱ्या कुटुंबियांसह ठाण्यात स्थायिक होऊन उदरनिर्वाहसाठी एकनाथ शिंदेंनी रिक्षाचालक म्हणून जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर ठाणे रिक्षा युनियनचे अध्यक्षपद भूषविलं.मात्र त्याआधी त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण किसननगर येथील महापालिकेच्या शाळा न.३ मध्ये,तर माध्यमिक शिक्षण कोपरी-ठाणे येथील मंगला विद्यालयात पूर्ण केलं.त्यानंतर मात्र त्यांचं पुढील शिक्षण आर्थिक विवंचनेमुळे खंडित झालं. कालांतराने त्यांनी कोरोनाशी लढा देत असताना आपल्या जिद्द आणि अभ्यासूवृत्तीच्या बळावर आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. आता मुख्यमंत्री पद भुषवून त्यांनी ठाण्याचं नावही चमकवल आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचा आयोजन दिवसभर करण्यात आलं होतं. आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना श्रीरामाचे प्रतीक असलेला चांदीचा धनुष्यबाण खास वाढदिवसाची भेट म्हणून दिला. मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध थरातील लोकांनी काल रात्रीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस देशातच नव्हे तर अगदी अमेरिकेतही साजरा झाला. मूळच्या ठाण्यात राहणाऱ्या आणि आता कामानिमित्त अमेरिकेत असलेल्या या तरुणांनी टाईम स्क्वेअर येथे केक कापून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला. ठाणेवार्ता आणि श्रीस्थानक परिवारातर्फेही मुख्यमंत्र्यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading