जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून वीज वितरण सेवा सुदृढ करणार – संजय केळकर

वाढत्या लोकसंख्येमुळे विजेची मागणी वाढत असून त्या प्रमाणात ग्राहकांना सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी बैठकीत दिली. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातील ब्रह्मांड, हिरानंदानी, बाळकुम, माजीवड्यासह शहरातील अनेक भागांत वीज खंडित होणे यासह वीज वितरण संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत आमदार संजय केळकर यांनी महावितरणचे अधिकारी आणि विविध विभागातील नागरिकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत विविध समस्यांवर चर्चा करून त्या तत्काळ निर्णय घेण्यात आले. सध्या वीज मीटरचा तुटवडा असून तातडीने मीटर उपलब्ध करून देण्याची मागणी केळकर यांनी केली. पुढील आठवड्यात पुरेसे मीटर उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. फिडर बॉक्स, नवीन केबल आदी कामांसाठी निधीची तरतूद करावी लागणार असल्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी पुरवणार असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले. वीज बिले भरण्यासाठी ऑनलाईन पर्याय असला तरी अनेक ठिकाणी वीज बिल केंद्रांवर जाऊन बिले भरली जातात. मात्र ब्रह्मांडसारख्या मोठ्या वसाहतींमध्ये पतसंस्थांच्या माध्यमातून वीज बिल केंद्रे सुरू करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading