ठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळे यांचं निधन

ठाणे महापालिकेचे माजी उपलेखापाल सुधाकर मुळे यांचं काल निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. १९६० ते १९९४ या काळात त्यांनी महापालिकेत सेवा केली. तत्कालीन नगरपालिका आणि महापालिकेतील कर्तव्य कठोर निस्पृह अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. सेवेतील दीर्घकाळ त्यांनी नगराध्यक्ष आणि महापौरांचे सचिव म्हणून काम केले. मुंब्रा, बाळकूम, कोपरी प्रभाग अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले. त्याचप्रमाणे जलतरण तलाव, गडकरी रंगायतनचे व्यवस्थापक आणि जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. निवृत्तीनंतर ब्राह्मण सोसायटीचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा पत्रकार मकरंद मुळ्ये, मुलगी, सून, जावई आणि नातवंडं असा परिवार आहे. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading