जितेंद्र आव्हाड अजित पवारांना घाबरतात, डोक्याला बंदूक लावून अजित पवारांनी त्यांची सही घेतली होती का -नरेश म्हस्के

जितेंद्र आव्हाड अजित पवारांना घाबरतात डोक्याला बंदूक लावून अजित पवारांनी त्यांची सही घेतली होती का अशी टीका नरेश म्हस्के
यांनी केली आहे. एकनाथ खडसे कोण आहेत. आयुष्य भारतीय जनता पार्टीत काढलं आणि आमदारकी मिळाली पाहिजे म्हणुन ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले आहेत. एकनाथ खडसेंनी पतीव्रतेच्या गप्पा करु नये. कालची जी आमची बैठक होती ती आमची महीन्याची बैठक असते यामध्ये संघटनात्मक कामकाज कसं असायला पाहिजे, कशा पद्धतीने लोकसभा जिंकण्याच्या दृष्टीने ही काय जी नवीन समीकरणे झालेत त्या दृष्टीने कसं काम करायचं या संदर्भात आमची बैठक होती असं नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केलं. याबद्दल काही जण अफवा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्हांला काही फरक पडत नाही. भाजपा, शिवसेना आणि अजित पवार यांच्या बरोबरचे आमदार अतिशय सुंदरपणे चांगल्या पद्धतीने सरकार चालवणार आहेत. त्यामुळे विनायक राऊत तुम्ही काय काळजी करु नका, तुम्ही तुमचं बघा, विनायक राऊत तुमच्यावर काय परिस्थिती येणार आहे ते बघा असंही म्हस्के म्हणाले. अजित पवारांनी जी जितेंद्र आव्हाडावर टीका केली त्यावर आव्हाडांना उत्तर द्यायला पाहिजे. ते का देत नाहित काय माहिती. मला वाटतं ते अजित पवार यांना घाबरतात. कालच्या सभेवरुन एक मात्र जाहिर झालं कि आमची नैसर्गिक मैत्री भारतीय जनता पार्टि बरोबर होती ती आम्ही सोडुन राष्ट्रवादी पक्षा बरोबर गेलो त्यामुळे आमचे पन्नास आमदार आणि तेरा खासदार बाजुला झाले. पण तोच राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येण्यासाठी, भाजपाबरोबर जाण्याकरिता किती पडद्यामागुन हालचाल करत होता. अजित पवार यांनी काल जाहिर केलं. आमचे आमदार गुवाहाटी आणि सुरतला होते त्यावेळी जे खोके खोके ओरडत होते. आता त्याच्यावर संजय राऊत काय बोलणार, यावर संजय राऊत का गप्प बसले आहेत असाही प्रश्न म्हस्के यांनी विचारला. बेंबीच्या देठाला कळ येईपर्यंत आव्हाड आणि त्यांची मंडळी ओरडत होती, खोके खोके बोलत होती. वज्रमूठ सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टेज वर मोठी मोठी भाषण दिली. त्याच जितेंद्र आव्हाडांनी शिंदेचा शपथ विधी पूर्ण होण्याआधी भाजप सोबत सत्तेत जावं म्हणून सही केली होती असंही नरेश म्हस्के यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading