ठाण्यातील नरेंद्र पाठक यांची साहित्य अकादमीवर सदस्य म्हणून नियुक्ती

ठाण्यातील नरेंद्र पाठक यांची साहित्य अकादमीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे. नरेंद्र पाठक हे उच्चशिक्षित असून त्यांनी के जे सोमैय्या आर्टस् आणि कॉमर्स कॉलेजचे उपप्राचार्य म्हणून काम पाहिलं आहे. त्याचप्रमाणे एस के सोमैय्या विद्या विनय मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचेही उपप्राचार्य म्हणून काम केलं आहे. त्यांना ३५ वर्षांचा शैक्षणिक अनुभव असून त्यांनी उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळाचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं आहे. वाणिज्य विषयावर लिहिलेलं पुस्तकही बालभारतीनं स्वीकारलं आहे. त्यांनी बोर्ड ऑफ स्टडीज् इन महाराष्ट्र या मंडळावरही काम पाहिलं आहे. ए क्रिटीकल स्टडीज् ऑफ कॉस्ट अॅनालिसिस ऑफ फी स्ट्रक्चर ऑफ प्रोफेशनल कोर्सेस इन महाराष्ट्र या विषयावर त्यांना पीएचडी मिळाली आहे. बालभारतीच्या वाणिज्य विभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. अभ्युदय बँकेचा उत्कृष्ट शिक्षक, ठाणे गौरव, ठाणे भूषण असे पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलं असून ठाण्यातील नववर्ष स्वागत यात्रेचे ते संस्थापक सदस्य आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या अनेक कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. अशा नरेंद्र पाठक यांच्या साहित्य अकादमीवर झालेल्या नियुक्तीबद्दल त्यांचं सर्व थरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading