छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मूत्रपिंड आणि शस्त्रक्रिया विभागाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आनंद दिघे हार्टकेअर सेंटरमध्ये मूत्रपिंड आणि त्यांसंबंधीत आजारांवरील शस्त्रक्रिया विभाग सुरू करण्यात आला असून याचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. गोरगरीब नागरिकांना उपचारासाठी दिलासा देणाऱ्या या रुग्णालयात लवकरच न्यूरोसेंटर देखील लवकरच सुरू करण्यात येईल असेही पालकमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनेक गोरगरीब रुग्ण उपचार घेत आहेत, येथे येणाऱ्या रुग्णांना सुपर स्पेशॅलिटी सेवा उपलब्ध व्हावी यासाठी आनंद दिघे हार्टकेअर माध्यमातून मोफत उपचार पध्दती सुरू झाली असून याचा फायदा आर्थिक दुर्बल्‍ घटकातील नागरिकांना होत आहे. या पार्श्वभूमीवर या मूत्रपिंड आजार आणि शस्त्रक्रिया विभागही सुरू करण्यात आला असून या ठिकाणी सर्व उपचार मोफत केले जाणार आहेत. प्लॅटिनम हॉस्प‍िटलच्या सहकार्याने हे दोन्ही विभाग कार्यान्वित असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. तसेच लवकरच न्यूरोसेंटर देखील सुरू करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी जाहिर केली. हार्ट केअर सेंटरच्या माध्यमातून आजवर अनेक गोरगरीब रुग्णांच्या बायपास शस्त्रक्रिया विनामोबदला झाल्या असून याबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading