चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस ३ प्रकल्प उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाची मागणी

चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस ३ प्रकल्प उभारण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्या संदीप लेले यांनी केली आहे. पालिका आयुक्तांना पत्र पाठवून त्यांनी ही विनंती केली आहे. ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठाणे पश्चिमेनंतर ठाणे पूर्वला देखील सॅटीस प्रकल्पाचं काम गतीने सुरू आहे. त्याच धर्तीवर चेंदणी कोळीवाडा येथे सॅटीस उभारून त्याची उन्नत मार्गिका कळव्याच्या नवीन पूलाशी जोडल्यास तिथून कळवा, मुंब्रा, नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळईत होईल. तसंच चेंदणी कोळीवाडा, खारटन रोड परिसर, खारकर आळी, महागिरी या ठिकाणच्या नागरिकांना सोसावी लागणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. असं संदीप लेले यांनी नमूद केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading