घोडबंदर रोडवरील बाळासाहेब ठाकरे चौपाटीवरील विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाट गणेश उत्सवापुर्वी होणार पुर्ण

घोडबंदर रस्त्यावरील बाळासाहेब ठाकरे चौपाटी येथील विसर्जन घाट आणि दशक्रिया विधी घाट गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार आहे. आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महापालिकेच्या अधिका-यांबरोबर या घाटांची पाहणी केली. यावेळी त्यांनी महापालिकेचे अधिकारी मोहन कलाल यांना विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाटाचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करून देण्यासंदर्भात सुचना केल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून मेरी टाईम बोर्ड आणि ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे सुरू असलेल्या गायमुख येथील बाळासाहेब ठाकरे चौपाटीचा टप्पा क्रं. १ नागरिकांसाठी खुला करण्यात आला असून चौपाटीचा टप्पा क्रं. २ वर विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाट गणेश उत्सवापुर्वी पुर्ण करण्यास सांगून उर्वरीत लँडस्केपींग गार्डन, पाथवे, सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक ही सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यास सांगितले. सरनाईक यांच्या आमदार निधीतून घोडबंदर रोडवर अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा कुठे बसवावी त्याची देखील पाहणी वाहतुक शाखेच्या अधिकार्यांसमवेत करण्यात आली. तसेच चौपाटीचे काम पुर्ण झाल्यानंतर अनेक पर्यटक, नागरिक तेथे येणार असल्याने भविष्यात गाड्या पार्किंगचा प्रश्न उद्भवू शकतो यासाठी चौपाटीवर किमान २०० गाड्यांची पार्किंग व्यवस्था करण्यात यावी तसेच या प्रकल्पासाठी ज्या नागरिकांच्या जमिनी जाणार आहेत त्यांचे देखील पुर्नवसन लवकरात लवकर करण्याचे आदेश मोहन कलाल यांनी दिले. भाइर्दर पाडा येथील ८०० मीटर लांबीची असलेली चौपाटी पुढे जावून २.४ कि.मी. पर्यंत होणार असून त्याचा फायदा घोडबंदर रोडवरील नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. या चौपाटीचे काम पुर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील खाडी किना-यावर ६ कि.मी. लांबीची सर्वात मोठी चौपाटी होणार असून यामध्ये कान्होजी आंग्रे यांच्या आरामाराची प्रतिकृती उभारण्यात येणार असल्याने महाराष्ट्रातील ही चौपाटी एक पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल असे आमदार सरनाईक यांनी सांगितले. भाइर्दर, ओवळा, काजूपाडा, मोघरपाडा, कोळीवाडा येथील भागात राहणार्या नागरिकांच्या घरी अप्रिय घटना घडल्यास त्यांना दशक्रिया विधी करण्यासाठी जवळपास घाट उपलब्ध नसल्याने मुंबई आणि इतरत्र ठिकाणी जावे लागत आहे. यासाठी जवळपास दशक्रिया विधी घाट झाल्यास नागरिकांना सुविधा मिळू शकेल यासाठी आमदार प्रताप सरनाईक पाठपुरावा करीत आहेत. परंतु या चौपाटीचे काम करणा-या ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे चौपाटीचे काम रखडल्याचे चित्र दिसून येत असल्याची बाब प्रताप सरनाईक यांनी अधिकार्यांच्या निर्दशनास आणून देऊन जर गणेश उत्सवापुर्वी विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाट झाला नाही तर सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनही मला लोकांच्या हितासाठी आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असे सरनाईक यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेच्या अधिकार्यांना मोहन कलाल यांनी लवकरात लवकर काम करण्याचे आदेश देऊन गणेश उत्सवापुर्वी विर्सजन घाट आणि दशक्रिया विधी घाट सुरू करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading