घरेलू कामगारांच्या न्यायासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमदार संजय केळकरांची ग्वाही

राज्यात हजारो गोरगरीब, काबाडकष्ट करणारे घरेलू महिला कामगार गेले अनेक वर्ष हक्काचे वेतन, सेवा सुरक्षितता आणि पेन्शनसाठी शासन दरबारी मोर्चा आंदोलने, उपोषणाव्दारे मागणी करीत असून त्यांना अद्यापी न्याय मिळाला नाही. आता यापुढे शासनाविरुद्ध एल्गार पुकारून घरेलू कामगारांना संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी आपण खांद्याला खांदा लावून लढू अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली. परळ येथे घरेलू कामगार नॅशनल डोमेस्टीक वर्कर्स वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने घरेलू महिला कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. राज्यात हजारो घरकाम करणा-या महिला आहेत. स्वतःचे घर सांभाळून रोजगारासाठी घरकाम करतात, काबाडकष्ट करतात. परंतु अशा महिलांना सेवा सुरक्षितता नाही. रोजगाराची हमी नाही. पेन्शन सारखी योजना लागू नाही. या सर्व मागण्या पूर्ण करणेसाठी घरेलू कामगारांचा आवाज शासन दरबारी पोहचविण्यासाठी आपला माणूस, हक्काचा माणूस या नात्याने आम्ही प्रयत्न करीत आहोत, असेही केळकर यांनी यावेळी सांगितले. राज्यात देशात विविध कामगार वर्गासाठी महामंडळे, शासकीय संस्था कार्यरत आहेत. त्या माध्यमातून संबंधित कामगारांना रोजगाराची हमी, वेतनाची हमी दिली जाते. परंतु घरेलू कामगारांच्या रोजगाराची आणि कल्याणाची हमी नाही. त्यासाठी घरेलू कामगारासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची निर्मिती करावी अशी मागणी केळकर यांनी केली. घरेलू महिला कामगाराच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असून त्यांचे प्रश्न देखील अधिवेशन काळात विधान सभेत शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहेत. तसेच लवकरच
संबंधित खात्याच्या केंदीय मंत्राची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहोत असे आश्वासन केळकर यांनी उपस्थित घरेलू कामगार महिला वर्गाना दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading