पलावा आणि परीसरात ऑफ लाईन पध्दतीने घरगुती गॅस पुरवठा लवकरच चालू होणार

पलावा आणि आजूबाजूच्या परीसरात मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती वाढत असून त्यात असंख्य नागरीक रहाण्यासाठी येत आहेत. या नागरीकांना पाईपलाईन द्वारे घरगुती गॅस पुरवठा घराघरात चालू करावा अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी महानगर गॅस कंपनीकडे केली. महानगर गॅस कंपनीकडे पाठपुरावा चालू केल्यानंतर असे निदर्शनास आले की मानपाडा येथे स्टील लाईन टाकण्याचे काम चालू केले असून या परीसरात गॅस पुरवठा करण्यासाठी ३/४ किलोमिटर गॅसची स्टील लाईन टाकणे जरूरीची असून यात दिवा-पनवेल गाडीच्या रूळांखालून ही लाईन टाकावी लागणार आहे. त्यामुळे यास किमान २/३ वर्षे कालावधी लागू शकतो याचा विचार करून त्वरीत गॅस पुरवठा चालू व्हावा म्हणून या भागात ऑफलाईन पध्दतीने गॅस पुरवठा चालू करावा अशी मागणी शिंदे यांनी केली. यादृष्टीने महानगर गॅस कंपनीने सर्व तांत्रीक बाजू तपासण्याची प्रक्रिया चालू केली असता यात अनेक अडचणी समोर आल्या. मात्र सर्व अडचणींवर मात करण्यात श्रीकांत शिंदे यांना यश आले असून प्रायोगीक तत्वावर खोणी येथे लोकशेअर ग्रीन परीसरातील रस्त्यावर ५० मिटर पट्ट्यात स्टील लाईन टाकण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. यामुळे आता लोढा पलावा शहर, कासा बेला, कासा रीओ इत्यादी परीसरातील रस्त्यांखालून स्टील लाईन टाकण्याचे काम करणे आता सुकर झाले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading