ग्लोबल कोविड हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्रातील व्हीआयपी कक्ष तत्काळ बंद करण्याची धर्मराज्य पक्षाची मागणी

ग्लोबल कोविड हॉस्पीटलमधील लसीकरण केंद्रातील व्हीआयपी कक्ष तत्काळ बंद करावा अशी मागणी धर्मराज्य पक्षानं महापालिका आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेनं अद्ययावत सुविधायुक्त ठाणे कोविड रूग्णालयातील लसीकरण केंद्रात शिस्तबध्द पध्दतीने रोज ९०० ते १००० लाभार्थ्यांचं लसीकरण या शीर्षकानुसार व्यापक लसीकरण मोहिम हाती घेतली आहे. महापालिकेच्या पत्रकात कुठेही व्हीआयपी ओन्ली असा उल्लेख नाही. तरीही ग्लोबल हॉस्पिटलमध्ये व्हीआयपींसाठी सातव्या मजल्यावर वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषत: बाजूलाच शेकडो अतिवरिष्ठ, वरिष्ठ, दिव्यांग नागरिक आपला नंबर येण्याची वाट पाहत बसलेले असतानाही हा व्हीआयपी कक्ष पूर्णपणे रिकामा आणि अतिशय आरामात असताना दिसतो. यामुळे शीघ्र लसीकरण मोहिमेस धक्का लागत असून नागरिक महापालिकेचे वाभाडे काढत आहेत. तर महापालिकेनं वेबसाईटवर प्रसिध्द केलेल्या फोटोत मात्र व्हीआयपी सूट दिसणार नाही अशी काळजी घेतली असून हे निषेधार्ह असल्याचं धर्मराज्य पक्षानं आपल्या पत्रात नमूद केलं आहे. महापालिकेनं प्रमाणपत्रामध्ये शिस्तीला विशेष महत्व दिलं असताना नागरिकांपेक्षा विशेष मुख्य व्यक्ती कोण हे जाहीर करावं आणि कुठेही उल्लेख नसलेला व्हीआयपी सूट काढून टाकावा अन्यथा तो पंतप्रधान आणि महापालिकेचा अपमान ठरेल. ग्लोबल कोविड हॉस्पीटलमध्ये लसीकरणाच्या वेळी सुरक्षारक्षक जेव्हा टोकन देतो, त्यावेळेस रजिस्टरमधील क्रमांक आणि प्रत्यक्षात दिलेले कुपन यामध्ये ६० ते ६५ क्रमांकाचा फरक असतो. याबाबतही हरकत घेतली असता थातूरमातूर कारणं सांगितली गेली. दररोज सुमारे हजार लसीकरण ६० ते ६५ यातील फरकाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी असंही धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी या पत्रात नमूद केलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading