ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शहरी भागात मूलभूत सोयी सुविधा उभारण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामुळे विविध मूलभूत सोयी सुविधा उभ्या राहिल्या आहेत. याच बरोबर आता मतदारसंघातील ग्रामीण भागात विविध पायाभूत सुविधा उभारणीसाठी शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातर्फे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या अंतर्गत रस्ते उभारणी, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, स्मशानभूमी बांधणे, दशक्रिया विधी घाट सुशोभीकरण, बंदिस्त गटारे, नाला, समाजमंदिर बांधणे यांसारखी विविध कामे मार्गी लागणार आहे. कल्याण लोकसभा मतदासंघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी देखील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागाकडून यासाठी नुकताच १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून रस्ते उभारणी, स्मशानभूमी बांधणे, दशक्रिया विधी घाट सुशोभीकरण, बंदिस्त गटारे, नाला, समाजमंदिर बांधणे यांसारखी कामे या अंतर्गत करण्यात आली आहे. कल्याण तसेच अंबरनाथ तालुक्यात या कामांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे मतदारसंघातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागाचा देखील चेहरामोहरा पालटणार आहे. अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गडाच्या पायथ्याशी मौजे कुंभार्ली या पुरातन मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मंदिर परिसराच्या सुशोभीकरणानंतर या मंदिर परिसराला एक नवी झळाळी प्राप्त होणार आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading