एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेने पाचवी, सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना

डोंबिवलीतील एस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम शाळेत गणिताच्या शिक्षिकेने पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. डोंबिवलीतीलएस एच जोंधळे विद्या मंदिर इंग्रजी माध्यम ह्या शाळेत गणिताच्या नीलम भारमल ह्या शिक्षिकेने पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना गणित येत नाही म्हणून बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये मुलांच्या मानेला हाताला भरपूर मारले आहे. लोखंडी रोडने आणि मारलेल असल्याने काही मुलं जखमी झाले अजून संतप्त पालकांनी शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी शाळेत मोठा गोंधळ घातला. यावेळेस शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देखील कारवाईसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका च्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली.पालकाचा संताप पाहताच मुख्याध्यापकाने संबंधित शिक्षकावर कारवाई करणार असल्याचे सांगितले. मात्र पालकाच्या म्हणण्यानुसार शाळेत मनाला येईल त्याप्रमाणे शहा प्रशासन शिक्षक म्हणून कोणालाही रुजू करत असल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ शाळेने मांडल्या असल्याचा आरोप देखील या वेळेस पालकांनी केला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading