गावदेवी वाहनतळावरील मैदान या महिना अखेरपर्यंत वापरण्यायोग्य करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

गावदेवी वाहनतळावरील मैदान या महिना अखेरपर्यंत वापरण्यायोग्य कराव असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत बांधण्यात आलेल्या गावदेवी येथील भूमिगत वाहनतळाची पाहणी आयुक्तांनी केली. त्याचे बांधकाम, रंगकाम पूर्ण झाले आहे. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. वाहनतळावरील आप्तकालीन यंत्रणा, प्रवासी आणि वाहनांची लिफ्ट, वायूवीजन सुविधा यांची खात्री करून घ्यावी. त्याचवेळी, वाहनतळावरील मैदान या महिनाअखेरपर्यंत नागरिकांना वापरण्यायोग्य करावे, असे त्यांनी सांगितले. फायर एक्झिट, अग्निशमन यंत्रणा, त्याला लागणारे पाणी सुरू करणारी स्वयंचलित यंत्रणा यांची सतत चाचणी घेतली जावी. त्याला लागणारी पाण्याची टाकी भरलेली आहे, यावर लक्ष ठेवावे. गावदेवी मैदानाची व्याप्ती ५६९० चौरस मीटर एवढी आहे. त्यापैकी, ४३१० चौ. मी जागेवर वाहनतळाचे बांधकाम केले आहे. त्यात, १३० चारचाकी आणि १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा आहे. जानेवारी २०१९ मध्ये काम सुरू झालेल्या या योजनेवरील खर्च सुमारे ३० कोटी रुपये इतका आहे. या वाहनतळामुळे स्टेशन, गोखले रोड या परिसरावर असलेला वाहनांच्या पार्किंगचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading