ठाण्याच्या शौर्या अंभुरे हिला अडथळा शर्यतीत सुवर्णपदक मिळालं असून ती आता महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. एकोणिसाव्या कौन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झाम च्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अलीकडे झाल्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये शौर्या अंभुरेनं ८० मीटर अडथळा शर्यतीत स्वतःचं जुने रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केलं आहे. तिला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं आहे. तसेच शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिला रौप्य पदक मिळालं आहे. शौर्या ही ठाण्याचे पोलीस उपायुक्त अविनाश अंभुरे यांची कन्या आहे. ठाण्यातील युनिव्हर्सल हायस्कूलमध्ये ती शिकत आहे. आता पुण्यात होणाऱ्या देश पातळीवरील स्पर्धेत शौर्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.