गहाळ झालेले सोन्याचे दागिने नौपाडा पोलीसांनी अवघ्या दोन तासामध्ये मिळवून दिले परत

तीन हात नाका येथे कारमधून उतरताना गहाळ झालेले दीड लाखाहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने नौपाडा पोलीसांनी अवघ्या दोन तासामध्ये परत मिळवून दिले आहेत. हिरानंदानी इस्टेट राहणा-या वसुधा बोरकर या आपल्या पतीसोबत कारनं काल तीन हात नाका येथे आल्या होत्या. त्या गाडीतून उतरत असताना ४० ग्रॅम सोन्याचे दागिने असलेली प्लास्टीकची पिशवी त्यांच्याकडून गहाळ झाली. सोन्याच्या दागिन्यांचे पिशवी गहाळ झाल्याचं त्यांना महापे इथे गेल्यावर लक्षात आलं. त्या तिथून परत दागिने शोधण्यासाठी ठाण्यात आल्या. पण दागिने न मिळाल्यानं त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दागिने गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल मांगले यांनी त्या भागात गस्त घालणा-या कल्पेश कदम आणि भूपेश भामरे यांना या दागिन्यांची माहिती दिली. त्यांनी फुले विकणा-या विक्रेत्यांना विश्वासात घेऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा एका फूल विक्रेत्यानं अशी पिशवी मिळाल्याचं सांगितलं. त्याच्याकडील पिशवीतील ४० ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची ओळख पटवून पोलीस निरिक्षक मांगले यांनी वसुधा बोरकर यांना परत दिली. पोलीसांमुळेच आपल्याला दागिने मिळाल्याबद्दल बोरकर यांनी पोलीसांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading