इराणी गुन्हेगार टोळीस अटक करून साडेचार लाखांची मालमत्ता जप्त

ठाणे पोलीसांनी इराणी गुन्हेगार टोळीस अटक करून साडेचार लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ठाणे, मुंबई, नवी मुंबई मध्ये चेन स्नॅचिंग आणि मोटर सायकल चोरीचे गुन्हे करून तात्काळ जिल्ह्याच्या बाहेर पळून जाणा-या इराणी टोळीतील सदस्य ठाणे शहरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक क्रमांक १ चे पोलीस हवालदार संभाजी मोरे यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून जाफर इराणी, फैजल अली शेख अशा दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता फैजल अली शेखकडून ३ लाख ८८ हजार किंमतीचे सोन्याचे दागिने तसंच ७० हजार रूपयांची मोटर सायकल असा साडेचार लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यामुळं एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading