खेळाडूंची आवड जोपासणारी ठाणे ही एकमेव महापालिका – ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱया ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनचे यंदाचे हे 30 वर्षे असून ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. नागरी सुविधा देत असतानाच खेळाडूंची आवड
जोपासणारी ही एकमेव अशी ठाणे महापालिका असल्याचे गौरवोद्गार ज्येठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी काढले. आणि यंदाची ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी स्पर्धकांसह क्रीडा
विभागाला देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. वन्समोअर या चित्रपटातील सर्व कलाकारांनी ठाणे महापालिकेतील ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी अभिनेता
आशुतोष पत्की, अभिनेत्री धनश्री दळवी, प्रसिध्द शेफ विष्णु मनोहर, चित्रपटाचे दिग्दर्शक नरेश बिडकर, निर्माता विनोद पाटील आदी उपस्थित होते. महापौर मिनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के
यांनी सर्व कलाकारांचे स्वागत करून त्यांच्या ’वन्समोअर’ या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
सर्व भाषांमधील सिनेमात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी काम केले आहे. वयाच्या 69 व्या वर्षी
देखील त्यांचा उत्साह हा वाखाणण्यासारखा आहे. ’वन्समोअर’ या चित्रपटात त्यांनी आजोबांची भूमिका साकारली आहे, त्यामुळे ठाणेकरांनी हा सिनेमा चित्रपटगृहात जावून पहावा असे आवाहन
सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी यावेळी केले.

यावेळी सर्व कलाकारांनी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेबद्दल जाणून घेतले आणि महापालिका राबवित असलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. या
स्पर्धेत दरवर्षी सहभागी होणाऱया ज्येष्ठ नागरिक सुनंदा देशपांडे आणि सोहम बैकर या शालेय विद्यार्थ्याला अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते मॅरेथॉन स्पर्धेचा अर्ज तसेच चेसनंबरचे वाटप करण्यात
आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading