खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे कोकण वासियांसाठी २०० मोफत बस सेवा

खासदार श्रीकांत शिंदे यांनी कोकण वासियांसाठी २०० मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. दिवा, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण या परिसरात कोकणी माणसाचं मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. कोकणामध्ये गणेशोत्सवाला महत्व आहे. चाकरमान्यांना गणेशोत्सवाकरिता कोकणात जाण्यासाठी या बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उद्यापासून या बसेस सुरू होणार आहेत. मंडणगड, दापोली, श्रीवर्धन, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, खारेपाटण, कणकवली, मालवण, देवगड, सावंतवाडी अशा १३ मार्गांवर या बसेस रवाना होणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading