खासगी कोरोना रुग्णालयांमध्ये दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर विनामूल्य उपचार करण्याची श्रीकांत शिंदेंची मागणी

खासगी कोरोना रुग्णालयांमध्ये दारिद्र्यरेषेखालील रुग्णांवर विनामूल्य उपचार करावेत अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या अधिकाधिक रुग्णांना वेळेवर आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी खासगी रुग्णालयांचीही मदत घेत आहेत. काही खासगी रुग्णालये केवळ कोरोनावरील उपचार करणारी रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत. परंतु अशा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पैसे आकारले जात असल्यामुळे विशेषतः दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा रुग्णांच्या विनामूल्य उपचारांची सोय या रुग्णालयांमध्ये महापालिकेने करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने डोंबिवली येथील निऑन रुग्णालय तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्त्वावर ताब्यात घेतले असून तेथील कर्मचाऱ्यांचा पगार महापालिकेच्या वतीने दिला जाणार आहे आणि रुग्णांवर विनामूल्य उपचार केले जाणार आहेत. याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही शहरातील खासगी रुग्णालये भाडेतत्त्वावर घ्यावीत आणि दारिद्र्यरेषेखालील रुग्णांना विनामूल्य उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading