डीजी ठाणेच्या माध्यमातून किराणा साहित्याची आता होम डिलिव्हरी मिळणार

ठाणे महापालिकेच्या डीजी ठाणेच्या माध्यमातून किराणा साहित्याची आता होम डिलिव्हरी मिळणार आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिकांचा ऑनलाईन सेवेद्वारे आवश्यक गोष्टी मागवण्याकडे कल वाढला आहे. नागरिकांची ही मागणी लक्षात घेवून आणि टाळेबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी पालिकेच्या डीजी ठाणे प्लॅटफॅार्मच्या वतीने झोमॅटोच्या माध्यमातून आता किराणा साहित्य घरपोच मिळणार आहे. पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून http://essentials.thanecity.gov.in/ हे विशेष संकेतस्थळ डिजी ठाणे या प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले असून दुकानांना आता झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत जोडण्यात आले आहे. पुरवठा-साखळीच्या आणि डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आस्थापना आणि डिलिव्हरी वाहने यांच्या नियमित निर्जंतुकीकरणाच्या माध्यमातून बहुविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. यासाठी कर्मचार्‍यांना आणि माल पुरवणार्‍या व्यापार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत, तसेच डिलिव्हरी करणाऱ्या मुलांना घरपोच डिलीव्हरी केलेले पदार्थ हाताळण्याबाबत योग्य दक्षता घ्यावी याचे प्रशिक्षणही देण्यात येत आहे. ज्यामध्ये सोशल डिस्टन्सींग चे पालन करणे, डिलीव्हरी बॉयने सॅनीटायझर, ग्लोव्हज, मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे तसेच संपर्क होणार नाही अशा डिलीव्हरीवर भर द्यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. किराणा साहित्य खरेदी करण्यासाठी संकेतस्थळाला भेट देऊन यादीतील दुकानदारांकडे फोनवरून संपर्क साधून ऑर्डर करु शकता. ऑर्डर केलेले किराणा साहित्य झोमॅटोच्या डिलीव्हरी बॉयच्या माध्यमातून रहिवाशांच्या घरपोच मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading