बोरिवडे येथील भूखंडावर महापालिकेची धडक कारवाई

घोडबंदर येथील बोरिवडे गावातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेला कोट्यवधींच्या भूखंडावर महापालिकेनं काल अचानक कारवाई केली. महापालिकेची कसलीही परवानगी न घेता या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलं होतं. या कारवाईच्या वेळी अतिक्रमण केलेले लोकं अक्षरशः चपला सोडून पळाले. या भूखंडावरील सर्व अतिक्रमण पालिकेचे अतिक्रमण निष्कासान विभागाने साफसूफ केले. घोडबंदर येथील बोरिवडे गावात महापालिकेचा आरक्षण क्रमांक 3 हा खेळाच्या मैदानासाठी आरक्षित भूखंड आहे. जवळजवळ ऑलंपिक दर्जाचे दोन स्टेडियम होतील इतका मोठा हा कोट्यवधींचा भूखंड आहे. मात्र या भूखंडाकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी काही लोकांनी पालिकेची परवानगी न घेता बेकायदा अतिक्रमण करून फुटबॉल टर्फ, क्रिकेट अकादमी, हॉर्स रायडिंग आदी व्यावसायिक प्रशिक्षण क्लासेस सुरू केले होते. मुंबईतील एकाने मुंबई क्रिकेट असोसिएशनशी साधर्म्य साधणारा मुंबई क्रिकेट क्लब नावाने या ठिकाणी अकादमी सुरू केली होती. ही बातमी प्रकाशित होताच पालिका प्रशासनाची एकच धावपळ सुरू झाली. याबाबत उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी तातडीने अहवाल मागवला होता. त्यावर त्वरित कारवाई करीत हा भूखंड पालिकेने ताब्यात घेतला. बोरीवडे येथील या मैदानाची बातमी प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी पालिकेने मोठी कारवाई केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading