खाडीमध्ये अडकलेल्या एका वैफल्यग्रस्त तरूणीची आपत्ती व्यवस्थापन पथकानं केली सुटका

खाडीमध्ये अडकलेल्या एका वैफल्यग्रस्त तरूणीची आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुटका केली. बाळकूम पाडा क्रमांक ३ येथील गणेश विसर्जन घाटाजवळ खाडीमध्ये अडकलेल्या नसीम शेख या वैफल्यग्रस्त तरूणीची आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकानं सकाळी सुटका केली. नसीम शेख ही युवती खाडीमध्ये अडकल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळाल्यानंतर पथकानं त्वरीत धाव घेत नसीम शेखची सुटका केली. नंतर तिला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading