घोडबंदर परिसरातील काही भागाची इंटरनेट सेवा ठप्प

महानगर टेलिफोन निगमची घोडबंदर परिसरातील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. महानगर टेलिफोन निगमच्या चरणामृत टेलिफोन एक्स्चेंजच्या एक किलोमीटरच्या परिसरातील ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. इंटरनेट सेवा देणा-या फायबर ऑप्टिक केबलमध्ये बिघाड झाल्यामुळं या परिसरातील इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचं सांगितलं जातं. अलिकडेच महानगर टेलिफोन निगममध्ये मोठ्या प्रमाणावर सेवानिवृत्ती योजना राबवण्यात आली होती. याअंतर्गत ३० वर्ष सेवा झालेल्या कर्मचा-यांना सेवानिवृत्ती देण्यात आली. याचा मोठा परिणाम निगमच्या कामकाजावर झाला आहे. या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी निवृत्त झाल्यामुळं सध्या महानगर टेलिफोन निगमकडे सर्वच प्रकारच्या मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळं या केबलचा बिघाडही दूर करण्यात विलंब होत असून त्याचा फटका इंटरनेट ग्राहकांना बसत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading