खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलचं अद्यावत अशा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टमध्ये रूपांतर

ठाणे महापालिकेचा दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल हा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट होत आहे. महापालिका आयुक्तांच्या विशेष प्रयत्नानं खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये नवीन कोर्ट, मॅटस्, आकर्षक रंगरंगोटी आणि एलईडी दिव्यांच्या सहाय्यानं अद्यावत आंतरराष्ट्रीय दर्जाचं बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात आलं आहे. पूर्वी खेळाडूंना लाकडी कोर्टवर आणि कमी प्रकाशझोतात सराव करावा लागत असे. पण खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत उच्च प्रकाशझोतात मॅटस् वर खेळावं लागत होतं. त्यामुळं खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉलमध्ये अद्यावत मॅटस्, आकर्षक रंगरंगोटी, एलईडी लाईटस् च्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन कोर्टस् तयार करण्यात आली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading