प्रशांत जाधव हल्ल्याचा तपास क्राईम ब्रॅंचकडे देण्याची भाजपाची मागणी

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी प्रशांत जाधव यांच्यावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्यातील आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबाबत आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी संबंधित तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवावा. तसेच वागळे इस्टेट पोलिसांच्या पक्षपाती वर्तनाची चौकशी करावी अशी मागणीही यावेळी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली. त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading