कोव्हीड चाचणीसाठी महापालिकेच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये पीसीआर लॅब सुरू

ठाणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या अति संपर्कातील संशयित रुग्णांची स्वॅब टेस्टींग करून तात्काळ अहवाल मिळावा याकरिता पालिकेच्या वतीने वाडिया हॉस्पिटलमध्ये स्वतःची नवीन अत्याधुनिक लॅब कालपासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
स्वॅब टेस्टींगसाठी मुंबईत उपलब्ध असणाऱ्या लॅबमधून आणि काही खासगी लॅबमधून कोरोनाची चाचणी करण्यात येत होती. त्यामुळे कधीकधी अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत होता. महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी युद्धपातळीवर पाठपुरावा करून वाडिया हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू केली आहे.
या प्रयोगशाळेसाठी आयसीएमआर तथा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे पाठपुरावा करून त्यांच्याकडून प्रयोगशाळेला मान्यता मिळविण्यात आली आहे. या लॅबमध्ये आता शहरातील कोरोना बाधीत रुग्णांचे स्वॅब टेस्टींग होणार आहे. दररोज 100 चाचण्या करण्याची क्षमता या प्रयोगशाळेची आहे. तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांच्यासह या प्रयोगशाळेमध्ये बायोसेफ्टी कॅबिनेट, रियल टाईम पीसीआर मशीन आदी अत्याधुनिक यंत्रांचा समावेश आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading