कोरोनाचा सामना करण्यासाठी आता तज्ज्ञ डॅाक्टरांचा टास्क फोर्स

कोव्हीड १९ चा वाढता प्रादूर्भाव रोखण्याबरोबरच मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश असलेला टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे. अशी माहिती पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. ठाण्यात सिव्हील हॅास्पीटल, होरायझन हॅास्पीटल, सफायर हॅास्पीटल, ज्यूपिटर हॅास्पीटल या ठिकाणी कोव्हीड १९ चे बाधीत रूग्ण दाखल होत आहेत. या टास्क फोर्समध्ये राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॅा. योगेश शर्मा, प्रसिद्ध मधुमेहतज्ज्ञ डॅा. आनंद भावे, किडनी विकार तज्ज्ञ डॅा. ज्योत्स्ना झोपे, डॅा. राजेंद्र गुंजोटीकर, डॅा. विद्या कदम, स्त्री रोग तज्ज्ञ डॅा. जयनारायण सेनापती, बालरोग तज्ज्ञ डॅा. जयेश पानोट, डॅा. सुहास कुलकर्णी, डॅा. संतोष कदम, भूलतज्ज्ञ डॅा. विजय पाटील, न्यूरो फिजिशयन डॅा. दिपक अहिवाले, ह्रदयरोगतज्ज्ञ डॅा. दयानंद कुंबला, चेस्ट स्पेशालिस्ट डॅा. अल्पा दलाल, वैद्यकिय तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश वैद्य, साथ रोग तज्ज्ञ डॅा. प्रिती पिलाय, इंटेसिव्हिस्ट डॅा. रवि घावत आदी तज्ज्ञ डॅाक्टरांचा समावेश आहे. तसंच घोषित करण्यात आलेल्या रूग्णालयांमध्ये भरती झालेल्या कोव्हीड १९ बाधीत रूग्णांची प्रकृती अस्थिर किंवा गंभीर वाटल्यास संबंधित रूग्णालयाच्या व्यवस्थापनाने महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॅा. अनिरूद्ध माळगावकर यांच्याशी ९७६९००७०७० तसेच कोव्हीड १९ चे विशेष कार्य अधिकारी डॅा. राम केंद्रे यांच्याशी ९७६९६७६९६० या व्हॅाटस ॲप क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading