कोविड वॅार रूमला भेट देऊन रुग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कोविडचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असून ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड तसेच इतर मुलभूत माहिती आणि सूचना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कोवीड वॅार रूमला आज महापालिका आयुक्तांनी भेट देवून कोणत्याही परिस्थितीत रूग्णांच्या तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. यावेळी महापालिका आयुक्तांनी वॅार रूमच्या फोनवर स्वतः फोन करून सर्व फोन सुरु असल्याची खात्री केली. कोरोना संदर्भात नागरिकांची गैरसोय होवू नये, उपलब्ध हॉस्पिटलची माहिती जलदरित्या उपलब्ध व्हावी यासाठी वॉर रूमची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये १० संपर्क क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना शहरातील उपलब्ध जवळचे रुग्णालय, उपलब्ध बेड्स, तसेच अत्यावश्यक रुग्णवाहिका आदी माहिती तात्काळ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या वॅाररूमध्ये 24 तास अधिकाऱी, डॉक्टर्स आणि डेटा ऑपरेटर्स नियुक्त करण्यात आले आहेत. रूग्णांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यात यावे, कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होवू नये, बेड उपलब्धतेची अचूक माहिती देण्याच्या सूचना त्यांनी वॉर रूममधील अधिकारी कर्मचाऱ्यांना दिल्या. या वॅार रूमध्ये तीन सत्रांमध्ये कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी ८६५७९०६७९१, ८६५७९०६७९२, ८६५७९०६७९३, ८६५७९०६७९४, ८६५७९०६७९५, ८६५७९०६७९६, ८६५७९०६७९७, ८६५७९०६७९८, ८६५७९०६८०१ आणि ८६५७९०६८०२ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading