वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुखदेव पाटील काल कोरोनाने निधन

वर्तकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुखदेव पाटील यांचं काल कोरोनाने निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी मुलगा, मुलगी, जावई, सून असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना झाल्यामुळे त्यांना वर्तकनगर येथील लाईफकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र अखेर त्यांची काल प्राणज्योत मालवली. मे मध्ये पाटील हे पोलीस सेवेतून निवृत्त होणारा होते. ठाणे पोलीस आयुक्तालयातील आत्तापर्यंत ३६ पोलीसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading